CLass VI- Marathi- चलन (Currency)


चलन (Currency)

कठिण शब्द

1.       चलन – Currency
2.       पंतप्रधान – Prime minister
3.       भाषण - Speech
4.       व्यवहार – Business, activity, work
5.       नाणी - coins
6.       आकार - shape
7.       वजन- weight
8.       टाकसाळ – a mint, a place where coins and currency notes are made
9.       आहत – punch-marked coins
10.   दिनांक – dated, a date
11.   देशाला उद्देशून – addressing the nation
12.   अर्थक्रांती – financial / economical revolution
13.   महत्त्वपूर्ण - important
14.   निर्णय - decision
15.   बाद झाल्या- out
16.   तमाम - all
17.   देवाण-घेवाण - trade
18.   वस्तू - things
19.   धान्य - grain
20.   वापर - use
21.   अडचण – difficulty, problem, trouble
22.   साम्य - similarity
23.   बहुतांश – most of the ..
24.   स्वरूपात – in the form of
25.   इ.स. पूर्व – before Christ
26.   शतक - century
27.   आधुनिक - modern
28.   यंत्रयुग – technical world, mechanical world / era
29.   सुबक आकार – nice shape
30.   सारखे वजन – same weight
31.   खूण - mark
32.   कारखाना – factory

समानार्थी शब्द (synonyms)

1.       रात्र = निशा, रजनी  (Night)
2.       झोप = निद्रा (Sleep)
3.       सोने = कनक, कांचन (Gold)
4.       चांदी = रजत (Silver)
5.       लोक = जन  (People)

विरुद्धार्थी शब्द (antonyms)

1.       रात्र x दिवस
2.       झोप x जाग
3.       देश x  विदेश
4.       आधुनिक  x  पुरातन  (modern X old)
5.       वेगवेगळे  x सारखेच (different X similar)
 

प्रश्न व उत्तरे (Question and Answers‌)

प्रश्न 1: चूक की बरोबर ते लिहा

1.      त्यांनी पन्नास व शंभर रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्याचे सांगितले.  :   चूक
2.       सुरुवातीला ही नाणी हातांनी बनविली जात : बरोबर
3.       आता बहुतांश देशात चलन हे नाणी व नोटांच्या स्वरूपात असते. : बरोबर
4.       महाराष्ट्र मुंबई येथे नाणी बनवण्याची टाकसाळ आहे. : चूक

प्रश्न 2 : रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द लिहा

1.       तुमच्याही आईबाबांची चंगलीच धावपळ झाली असेल ना !
2.       चलनम्हणजे व्यवहारातील देवाण-घेवाणीचे विश्वसनीय माध्यम होय.
3.       प्रत्येक देशाच्या चलनाचे नावही वेगळे असते.
4.       नाणी बनवण्याच्या कारखान्यास टाकसाळ म्हणतात.
5.       आपले चलन भारतीय रिझर्व बॅंक तर्फे बनवले जाते.

प्रश्न 3: खालील प्रश्नांची एक ते दोन वाक्यात उत्तरे लिहा.

1.       दिनांक 8 नोव्हेंबर 2016 रोजी प्रतप्रधानांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात कोणत आ निर्णय जाहीर केला ?
उत्तर: दिनांक 8 नोव्हेंबर 2016 रोजी प्रतप्रधानांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पाचशे व हाजार रुपायाच्या नोटा चलनातून बाद झाल्याचा निर्णय जाहीर केला.

2.       चलन म्हणजे काय?
उत्तर: चलन म्हणजे व्यवहारातील देवाण-घेवाणीचे विशवसनीय माध्यम होय.

3.       पूर्वीच्या काळी देवाण-घेवाणीसाठी कशाचा वापर करत?
उत्तर: पूर्वीच्या काळी देवाण-घेवाणीसाठी वस्तूंचा किंवा धान्याचा वापर करत.

4.       सुरुवातीला नाणी कशांनी बनविली जात?

उत्तर: सुरुवातीला नाणी हातांनी बनविली जात.

5.       आता बहुतांश देशात चलन कशाच्या स्वरूपात असते?

उत्तर: आता बहुतांश देशात चलन नाणी व नोटांच्या स्वरूपात असते.

6.       टाकसाळ म्हणजे काय?
उत्तर: नाणी बनविण्याच्या कारखान्यास टाकसाळ असे म्हणतात.

प्रश्न 4 : खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

1.       भारातातील तमाम लोकांची झोप का उडाली ?

उत्तर: दिनांक 8 नोव्हेंबर 2016 रोजी प्रतप्रधानांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पाचशे व हाजार रुपायाच्या नोटा चलनातून बाद झाल्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे ज्या लोकांकडे पाचशे व हजार रुपयाच्या नोटा होत्या त्यांच्या पैशाची किंमत अचानलक शून्य झाली. म्हणून भारतातील तमाम लोकांची झोप उडाली.

2.       पूर्वीच्या काळी व्यवहारात गोंधळ का होत असे ?

उत्तर: पूर्वीच्या काळी नाणी हातांनी बनविली जात. त्यामुळे त्या नाण्यांच्या आकार व वजनात साम्य नसे. त्यामुळे व्यवहारात गोंधळ उडत असे.


No comments:

Post a Comment